• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्या उरणमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा

ByEditor

Nov 28, 2025

उरण । घनश्याम कडू
उरण नगरपरिषद निवडणूक २०२५ चे रणशिंग फुंकताच उरणमध्ये राजकीय तापमान चढू लागले असून, महाविकास आघाडीने आपली जोरदार ताकद दाखवत शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता एन. आय. हायस्कूल मैदान, उरण येथे भव्य जाहीर प्रचार सभेचे आयोजन केले आहे.

उरणच्या निवडणुकीतील हा सर्वात मोठा आणि सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारा मेळावा ठरणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे, जनतेचे लोकप्रिय तडफदार नेते खासदार अमोल कोल्हे, उरणमध्ये सर्व स्तरावर लोकसंग्रहाचा ठसा उमटवणारे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे दमदार युवानेते आमदार रोहित पवार हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या चौघांच्या उपस्थितीमुळे उरणची राजकीय हवा ढवळून निघणार हे निश्चित मानले जात आहे.

महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि नेतृत़्व यांच्याकडून आयोजित ही सभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीचा जोरदार शक्तिप्रदर्शनाचा संदेश देणारी ठरणार असून, विरोधकांच्या गणितात घोळ घालणारी अशी ही सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. सभा स्थळावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिकांचा ओघ अपेक्षित आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, व ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याची दिशा या सभेतून ठरवावी.सभेच्या तयारीला उरणमध्ये वेग आला असून, परिसरात महाविकास आघाडीच्या उत्साहाचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!