पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावने केला जाहीर सत्कार
सोगाव । अब्दुल सोगावकर
अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत गावचे सुपुत्र सुहृद आशा श्रीकांत मोरे यांना नुकताच केंद्र सरकार तर्फे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा २३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे होणार असून त्यांना भारताच्या प्रथम नागरिक तथा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत. त्यांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे त्यांच्या मुशेत येथील निवासस्थानी जाऊन अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सुहृद मोरे यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण अलिबागमध्येच झाले आहे, त्यानंतरचे त्यांचे पुढील विज्ञानाचे शिक्षण व कार्य पुणे, जर्मनी, शिकागो, जपान, अमेरिका, चीन, नेदरलँड अशा विविध देशातील ठिकाणी झाले आहे.
सुहृद श्रीकांत मोरे यांना रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी शुभेच्छा देण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे श्री क्लासेसचे संस्थापक संतोष राऊत, माजी मापगाव ग्रामपंचायत उपसरपंच अशोक नाईक, माजी सदस्य विजय भगत, मजीद कुर तसेच दत्तात्रय राऊत, उत्तम राऊत, मुशेत पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे, मंगेश सुतार, गितेश करळकर, राजेंद्र करळकर, तेजस काठे, सुतेज लबदे, रुपेश निर्गुण, सुनील अनमाने, मुदस्सर कुर, निखिल करंजूकर, महेश सावंत, शफी वाकनीस व इतर अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
