माणगाव | सलीम शेख
महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नाते गावातील ७६ वर्षीय महिला लीलावती बलकवडे यांचा शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी शेतातील वाड्यावर कामानिमित्त गेले असता संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांनी केला असता संशयित आरोपी अभिजीत आंबवले, रा. नाते, ता. महाड, जि. रायगड याची सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
महाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने सदर महिलेच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केला होता, तो आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, लाला वाघमोडे, बाबासो पिंगळे, सोंडकर, पहेलकर व इतर कर्मचारी यांनी केली.
