महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान तणाव
महाड │ मिलिंद माने
महाड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण करणारी गंभीर घटना आज समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांना तब्बल 50 ते 60 जणांच्या जमावाने घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशा पद्धतीचे कृत्य केले जात असल्याचा आरोप केला.
मारहाण व तोडफोडीचाही प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक जमलेल्या गटाने जाबरे यांना चुकीच्या पद्धतीने घेरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींनाही धमकावण्यात आले, तर त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये एका अंगरक्षकाचे रिव्हॉल्वर हिसकावण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
निवडणुकीचा वातावरण बिघडवण्याचा हेतू – जगताप
या घटनेचा तीव्र निषेध करताना स्नेहल जगताप म्हणाल्या,
“नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा आणि निवडणुकीचे वातावरण दूषित करण्याचा हा उद्देश स्पष्ट दिसत आहे. काही मंडळी जाणूनबुजून घटना घडवून नंतर ‘आमच्यावर अन्याय झाला’ असा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारांना महत्त्व देऊ नये.”

त्यानंतर त्यांनी पुढे म्हटले, “विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाडकरांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मतदानाचा लोकशाही अधिकार निर्भयपणे बजावावा.”
युतीचा विजय निश्चित – स्नेहल जगताप
महाड नागरपालिकेच्या निवडणुकीत युतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.
“मी स्वतः, खासदार सुनील तटकरे आणि आमदार प्रवीण दरेकर नागरिकांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे आहोत,” असे त्यांनी सांगितले.
कडक कारवाईची मागणी
ही घटना लक्षात घेता स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.