पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार संपन्न
अभय पाटील
बोर्लीपंचतन : बोर्ली पंचतन येथे 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालय श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय व फातिमा बीबी उस्मान मुर्तुझा इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये ज्येष्ठ शिक्षक संदीप जनार्दन पाटील यांच्या हस्ते त्याचप्रमाणे दिघी सागरी पोलीस ठाणे बोर्लीपंचतन या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांच्या हस्ते, ग्रुप ग्रामपंचायत बोर्लीपंचतन या ठिकाणी नवनिर्वाचित उपसरपंच सायली शंकर गाणेकर यांच्या हस्ते तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ध्वजारोहण सरपंच ज्योती दीपक परकर यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने बोर्लीपंचतन येथील वसुधा लीलाधर खोत व मानसी मकरंद जाधव या दोन महिलांचा सत्कार सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सरपंच ज्योती परकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उपसरपंच सायली गाणेकर व माजी उपसरपंच मन्सूर गिरे यांच्या हस्ते बोर्ली पंचतन येथील माजी स्वातंत्र्य सैनिक शामकांत जाधव तसेच कै. नारायण कविलकर यांचाही सन्मान करण्यात आला. कै. नारायण कविलकर यांचा सन्मान त्यांची पत्नी रजनी कविलकर यांनी स्विकारला कै. नारायण कविलकर यांचा सुपुत्र गणेश कविलकर हा देखील सध्या सैन्यामध्ये आपली चोख कामगिरी बजावत आहे. या ध्वजारोहरण प्रसंगी बोर्लीपंचतन येथील सर्व विद्यालयाचे विद्यार्थी वर्ग, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
