माणगाव । सलीम शेख
पुणे-माणगाव-दिघी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत मारुती सुझुकी वॅगनार गाडीची डिव्हायडरला धडक लागून अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ४ डिसेंबर रोजी माधव मेहता हे त्यांचे मालकीची मारुती सुझुक वॅगनार गाडी क्र. एमएच १२ युसी ०७३१ ही स्वतः चालवित घेवुन जात असताना पुणे माणगांव रोडने ताम्हीणी घाट मार्गे जात असताना मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत टी. पॉईंट पुढे सकाळी १० वाजता आल्यावेळी अचानक त्यांचे कार समोर कुत्रा आल्याने त्यांनी कार रोडच्या उजव्या बाजुला घेतली असता रोडच्या कडेला असलेल्या डिव्हाडरला कारची ठोकर लागुन अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी निलीमा माधव मेहता (वय ७०) यांच्या तोंडाला, उजव्या हाताच्या कोपऱ्याला गभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात गाडीचे नुकसान मोठे झाले आहे.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. जाधव करीत आहेत.
