• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रिया उभारे बिनविरोध

ByEditor

Dec 4, 2025

माणगाव । सलीम शेख
रायगड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिया रत्नाकर उभारे यांची गुरुवार दि.४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी नगरसेवक,नगरसेविका यांची विशेष सभा बोलावून केली. या निवडीवेळी प्रांताधिकारी यांच्यासमवेत मदतीस म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी उपस्थित होते. रिया उभारे यांची माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

माणगाव नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर – काळे यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यावर राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम रायगड जिल्हाधीकारी किशन जावळे यांनी जाहीर केला होता. त्यानुसार या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रिया रत्नाकर उभारे यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सोमवार दि.१ डिसेंबर रोजी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर गुरुवार, दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी नगरसेवक,नगरसेविका यांची विशेष सभा बोलावून उपनगराध्यक्षपदी रिया रत्नाकर उभारे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची मी पीठासन अधिकारी डॉ. संदीपान सानप बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करीत असल्याचे सांगितले.

माणगाव नगरीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रिया उभारे यांचे खा. सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण विभाग प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, योगिता चव्हाण, प्रदेश राष्ट्रवादीचे युवक सचिव दिपक जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काका नवगणे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय अधिकारी, जिल्हा राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, जेष्ठ नेते राजाभाऊ जाधव, नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा संगीता बक्कम, तालुका महिला उपाध्यक्ष श्रद्धा यादव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, संदीप खरंगटे, शुभांगी जाधव, सचिन बोंबले, राजेश मेहता, हर्षदा सोंडकर-काळे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नितीन वाढवळ, उणेगावचे माजी सरपंच राजेंद्र शिर्के, डॉ. परेश उभारे, युवानेते सिद्धांत देसाई, भाजपच्या नगरसेविका ममता थोरे, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, सुधीर पवार, मिलिंद फोंडके, संदेश मालोरे, राहुल दसवते, भाई दसवते, दिपक मोरे, राजेश छेडा, चेतन गवाणकर, किशोरी हिरवे, प्रभाकर मसुरे, घनशाम शेट, सुजाता शेट, हाजीमिया करदेकर, सागर गांधी आदींसह उभारे कुटुंबीय, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच माणगाव तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ बंधू – भगिनी यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या निवडीबद्दल प्रसार माध्यमांजवळ बोलताना नवनिर्वाचित माणगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा रिया उभारे यांनी सांगितले कि, सुरुवातीलाच मी आमचे नेते खा. सुनील तटकरे साहेब, मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे मनापासून आभार व ऋण व्यक्त करीत त्यांनी मला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली असे सांगत या संधीचे मी सोने करीन. मी माणगाव नगरीच्या विकासासाठी मला जो काही उपनगराध्यक्ष पदाचा कालावधी मिळाला आहे त्या कार्यकाळात सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!