• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएसडब्ल्यू संजीवनी हाॅस्पिटलमध्ये रुग्णांची होणार मोफत अँजिओप्लास्टी

ByEditor

Aug 16, 2023

किरण लाड
नागोठणे :
काही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट तसेच महागड्या असतात. त्या सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या नसतात. मग पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आता अशा रुग्णांना घाबरण्याची गरज राहणार नाही. कारण देशातली मोठी स्टील कंपनी जेएसडब्ल्यू डोलवी हीने गरीब, सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचारासाठी संजीवनी मल्टीस्पेशलिटी हाॅस्पिटल सुरु केलेले आहे. त्यामध्ये रुग्णांची अँजिओप्लास्टी सारखी कठीणातील कठीण शस्रक्रिया मोफत होणार आहे.

हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले तर हृदयविकाराचा झटका येतो. मग तो अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. ही शस्त्रक्रिया किचकट तसेच महागडी असते. ती सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी नसते. मात्र आता रुग्णांना घाबरण्याची गरज नाही कारण जेएसडब्ल्यू संजीवनी हाॅस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी हाॅस्पिटलमध्ये मोफत अँजिओप्लास्टी उपचार सुरु करण्यात आला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने आपल्या संजीवनी हाॅस्पिटलद्वारे परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना अँजिओप्लास्टी सारखी मोफत उपचाराची सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल येथील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!