• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हरिहरेश्वरला गाव स्वच्छतेची स्पर्धा

ByEditor

Aug 16, 2023

आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबाला मिळणार ५००० धनादेश

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे मंदिर संस्थेच्या वतीने ‘स्वच्छ माझे आवार स्वच्छ माझे शेजार’ या उपक्रमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पात्र ठरणाऱ्या कुटुंबाला ५ हजार रुपयांचा धनादेश व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

हरिहरेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी या उपक्रमात गावच्या स्वच्छतेसाठी सहभागी व्हावे असे आवाहन श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थेकडून स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी करण्यात आले. संस्थेचे सचिव सिद्धेश पोवार यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष व विश्वस्तांच्या सहकार्याने श्री क्षेत्र हरिहरेश्वर परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये गावातील प्रत्येक जण स्पर्धक असेल, त्याने आपले घर व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून या स्पर्धेत विजय मिळवायचा आहे. या स्पर्धेतील विजेत्याचे नाव २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी जाहीर करण्यात येईल. प्रथम येणाऱ्या एकाच घर मालकास संस्थेच्या वतीने ५००० रकमेचा धनादेश व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ ५ घरमालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी सर्व प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा गाभा आहे. यातून अनेक गावांना प्रेरणा मिळेल हाच संकल्प आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!