शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांचे पारडे जड; कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश
नागोठणे। किरण लाड
जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच नागोठणे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागोठणे मीरानगर येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे तरुण उद्योजक आणि जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या पाठिंब्यामुळे काते यांची या गटातील ताकद वाढली असून त्यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

मीरानगर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांनी आणि तरुणांनी हा निर्णय घेतला. विभाग संघटक दिनेश घाग यांच्या पुढाकाराने या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मुख्य विचारधारेत सामावून घेण्यात आले.

असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी मीरानगर मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष असगर शब्बीर सय्यद, खजिनदार सादिक सय्यद, युवा नेते जलील अब्बास शिंधी, नजीर रहमान मोहने यांच्यासह मुराद शेख, फरीद बोडेरे, हसन शेख, मोहम्मद अली अनवरे, अहमद शेख आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी सुमित काते यांना पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात या प्रसंगी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर, रोहा तालुका महिला प्रमुख वर्षा सहस्रबुद्धे, विभाग प्रमुख प्रविण ताडकर, शहर प्रमुख संतोष चितळकर, विभाग संघटक दिनेश घाग, सामाजिक कार्यकर्ते विजय धामणे, संजय पिंपळे, यतीश डाकी, संपर्क प्रमुख संजय कणघरे, प्रसाद जाधव, राज दुर्गावले आणि संदीप वाजे यांच्यासह अनेक शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
| नागोठणे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – सुमित काते “मीरानगर येथील माझ्या मुस्लिम बांधवांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. बांधवांनी सुचविलेल्या विकासकामांपैकी कब्रस्तानला संरक्षण भिंत आणि अंतर्गत पेव्हर ब्लॉकचे काम शिवसेनेच्या माध्यमातून प्राधान्याने पूर्ण केले जाईल. नागोठणे विभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे.” — सुमित काते (उमेदवार, शिवसेना) |
