• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव येथील चेतक कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ByEditor

Aug 17, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगाव येथील मुंबई गोवा महामार्गाची ठेकेदार कंपनी चेतक इंटरप्रयझेसच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच ते सहा अज्ञात कार्यकर्त्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद चेतक इंटरप्रायझेसचे सुरक्षारक्षक रमेश लक्ष्मण शेलार यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चेतक इंटरप्रयझेस लिमिटेड सबलेट सन्नी इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कॅम्प कार्यालयामध्ये मनसे पक्षाचे ५ ते ६ कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश करून गैरकायद्याची मंडळी जमवून मोठमोठ्याने घोषणा देऊन रस्ता लवकरात लवकर करा असे ओरडुन फिर्यादी यांची वरिष्ठांची मीटिंग चालू असताना त्यांना कार्यालयाच्या बाहेर सांगून सर्वजण बाहेर गेल्यानंतर कार्यालयामध्ये आरडाओरडा करून चार ते पाच खुर्च्यांची तोडफोड करून निघून गेले. याप्रकरणी मनसेच्या अज्ञात आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु. रजि. नं. २६७/२०२३ भादवी संहिता कलम ४४७,१४३, १४७, १४९,४२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) ,३७, (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव श्री. पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!