• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धोंडू गायकर यांचे निधन

ByEditor

Aug 17, 2023

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी धोंडू गायकर (वय ६२) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजमन हळहळलं.

ग्रामपंचायतमधील नोकरीतून निवृत्त होऊन ते व्यवसायात गुंतले. पूर्वीपासूनच अभिनयाची आवड असल्याने येथील रंगभूमीवर त्यांनी चांगल्या भूमिका गाजवल्या. यासोबतच गायनाची देखील आवड होती. पंचक्रोशीत सर्वांचे परिचयाचे असल्याने त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांची नोकरीतील कारकीर्द व एक कलाकार म्हणून अनेकांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात मुले, नातवंड असा परिवार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!