किरण लाड
नागोठणे : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या ५व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागोठणे येथील भाजप कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी धनराज उमाळे यांनी माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जीवनातील काही प्रसंग व आठवणी सांगुन कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास रोहा तालुका भाजपचे सरचिटणीस आनंद लाड, भाजपा महिला रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, रोहा तालुका महिला उपाध्यक्षा अपर्णा सुटे, रोहा तालुका शिक्षण सेलचे अध्यक्ष अशोक अहिरे, भाजपा रोहा तालुका उपाध्यक्ष अंकुश सुटे, किशोर म्हात्रे, वांगणी ग्रा. पं.चे माजी सरपंच एकनाथ ठाकूर, रोहा तालुका उपाध्यक्ष शिक्षक सेल धनराज उमाळे, भाजपा रोहा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष रऊफ कडवेकर, रोहा तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष जावेद दापोलकर, हेमंत लाड व गफुर फामे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.