• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा, दोघांना अटक

ByEditor

Jan 19, 2026

​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लागणारे १.२१ लाखांचे ब्रास धातू जप्त

​पेण | विनायक पाटील
पेण नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉलमधील साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला १ लाख ३८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​पेण येथील प्रसिद्ध शिल्पकार गणेश प्रशांत मयेकर हे नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवण्याचे काम करत आहेत. या कामासाठी लागणारे १,२१,९०० रुपये किमतीचे ब्रास (पंचधातू) अज्ञात चोरट्याने १४ जानेवारीच्या रात्री कारखान्याच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरून नेले होते. याप्रकरणी मयेकर यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

​घटनेचा गांभीर्याने तपास करताना घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरातील अन्य सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले.

​चौकशीअंती आरोपी ​तरुण विलास चव्हाण (वय २१ वर्षे, रा. आय.टी.आय कॉलेज जवळ, पेण) व ​राम विजय गवळी उर्फ रामा रेड्डी (वय ३७ वर्षे, रा. आय.टी.आय कॉलेज जवळ, पेण) यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे

​घरफोडीचा दुसरा गुन्हासुद्धा उघड

​पकडलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी पेण पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या दुसऱ्या गुन्ह्यातील १६,७०० रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. अशाप्रकारे पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, सपोनि सुनील चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि प्रकाश कोंढरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन वाघ, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, गोविंद तलवार, संदीप शिंगाडे या पथकाने केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!