• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोलादपूरनजीक वॅगनर कारचा अपघात; कार तीन ते चार वेळा पलटी

ByEditor

Jun 1, 2023

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम असून पोलादपूरनजीक वॅगनर कारचा अपघात घडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रशांत विजय धाडवे हे आपल्या ताब्यातील वॅगनार कार घेऊन कुटुंबासह रत्नागिरी दिशेने जात असता पोलादपूर नजीक सायली धाबा येथे आले असता बैल आडवा आल्याने बैलाला वाचविण्यासाठी त्यांनी कार डाव्या बाजूला घेतल्याने कार महामार्गावरील लोखंडी बॅरिकेटवर आदळून तीन ते चार पलटी घेऊन अपघात घडला. या अपघातात चालकासह चौघेजण किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार विनोद महाडिक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस हवालदार रुपेश पवार हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!