किरण लाड
नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी बोर्डाच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याच्या भवितव्यासाठी दहावी ही शिक्षणाची महत्वाची पायरी आहे. या निकालाची वाट विद्यार्थ्यी व पालक मोठ्या आतुरतेने पाहत असतात. बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे उद्या शुक्रवार, दि. 2 जुन 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता आॅनलाईन जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच maharashtra SSC result या होमपेजवर क्लिक करुन विद्यार्थ्यांनी आपला हाॅल तिकिट क्रमांक टाकुन आवश्यक ती माहिती टाकुन आपला निकाल प्राप्त करायचा आहे.