किरण लाड
नागोठणे : विभागात प्रसिद्ध तसेच नावाजलेल्या केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी प्रफुल्ल पांडुरंग नागोठणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा श्री कानिफनाथ मंदिर, मराठाआळी येथे आयोजित करण्यात आली होती. मंडळाचे यंदा ६२वे वर्ष आहे. सन २०२३ ते २०२४ या सालासाठी अध्यक्ष, प्रफुल्ल नागोठणेकर, उपाध्यक्ष संजय पाटील, सेक्रेटरी मंगेश लाड, खजिनदार संतोष उर्फ बाबु घाग, सह सेक्रेटरी मनोज गायकवाड, सह खजिनदार प्रज्योत कडव, कार्याध्यक्ष रोहीदास हातनोलकर, संतोष चितळकर, रविंद्र वाजे, सल्लागार विजय नागोठणेकर, किरण लाड, सुदाम घाग या पदाधिकाऱ्यांची तसेच सदस्यांची निवड केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिटिंगमध्ये एकमताने करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष दिनेश घाग व त्यांचे पदाधिकारी यांचा गणेशोत्सव कालावधीत त्यांनी केलेले यशस्वी तसेच भरीव कार्याबद्दल गणेशोत्सव कमिटी तसेच ग्रामस्थांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व नवनियुक्त अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.