प्रतिनिधी
नागोठणे : लोकप्रिय तसेच अन्यायाला वाचा फोडणारे, वाचकांच्या पसंतीस उतरलेले ‘रायगड जनोदय’चे संपादक मंगेश पत्की यांनी पत्रकार किरण लाड यांच्या कामाचा धडाका बघुन त्यांची रायगड जनोदयाच्या उपसंपादक पदी नियुक्ती केल्याबद्दल तसेच ते वेळोवेळी पाणी, वीज, आरोग्य या संदर्भातील माहिती तत्परतेने नागोठणे तसेच विभागातील जनतेला देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल केएमजी विभाग ग्रामस्थ तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व आई जोगेश्वरी गोविंदा पथकातील गोविंदा या सर्वांच्या वतीने किरण लाड यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

केएमजी विभाग गणेशोत्सव मंडळाच्या मिटींगमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक सुनील लाड, विजय नागोठणेकर, सुदाम घाग, आनंद लाड, दिनेश घाग, रोहिदास हातनोलकर, राजेंद्र गायकर, संतोष नागोठणेकर, किरण लाड, संतोष घाग, मनोहर कडव, रविंद्र वाजे, संतोष चितळकर, उदय लाड, अमित पवार, केतन राजीवले, नितिन राजीवले, रुपेश पोटे यांनी आपले विचार यावेळी व्यक्त करुन मंडळाला मार्गदर्शन केले. केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल नागोठणेकर यांनी येणारा गणेशोत्सव भव्यतेने साजरा करण्यासाठी आजी, माजी पदाधिकारी, सल्लागार, सभासद, केएमजी विभागातील ग्रामस्थ यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे माजी सचिव रोहिदास हातनोलकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
