• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगांवमध्ये भाजप तर्फे दैनिक सामनाची होळी

ByEditor

Aug 20, 2023

सलीम शेख
माणगांव :
दै. सामनाच्या अग्रलेखामधून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याने महाराष्ट्रभर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माणगावमध्ये रविवार, दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार व सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून काही काळासाठी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरत सामना वृत्तपत्राची होळी केली.

या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश साटम, युवा मोर्चा उपाध्यक्ष चिन्मय मोने, शहर अध्यक्ष नितीन दसवते, भाजपा युवानेते निलेश थोरे, तालुका युवामोर्चा अध्यक्ष रितेश निवाते, ऊ. भा. सेल अध्यक्ष आनंद राजबर, ग्रा. प. सदस्य योगेश पालकर, अरुणशेठ पेणकर, पेण मा. उपसरपंच ढऊळ, भाजपा युवानेते निलेश थोरे, परेश सांगले, मंदार मढवी, राकेश जाधव, अभिजित मोने व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना भाजपा युवानेते निलेश थोरे यांनी सांगितले कि, एकेकाळी ज्या सामना वृत्तपत्रामधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा जागर केला व मराठी माणसाच्या अस्मितेला फुंकर घातली त्या सामना वृत्तपत्रामधून संजय राऊत हे खोडसाळ विधाने करून सामनाची विश्वासार्हता गमावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसतय. ज्या संजय राऊतांनी वाचाळवीरपणा करून शिवसेना फुटण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला ते आता सामनाचे दुकान देखील बंद पाडायला निघाले. पण भाजपा कार्यकर्ते यापूढे भाजपाच्या कोणत्याही नेत्याबद्दल टीका सहन करणार नाहीत. संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!