• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक वडवळकर यांचा सन्मान

ByEditor

Aug 20, 2023

प्रतिनिधी
अलिबाग :
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक वडवळकर यांचा सन्मान करण्यात आला.

१९ ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशन शी सलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने दरवर्षी अलिबाग मधील ज्येष्ठ छायाचित्रकारांचा मानपत्र, शाल, श्रीफल, तुळशी चे रोप देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी १९८९ ते २०१४ पर्यंत २५ वर्षे छायाचित्र क्षेत्रात नावाजलेले अलिबागमधील ६५ वर्षीय छायाचित्रकार अशोक वडवळकर यांचा सन्मान करण्यात आला.

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे सल्लागार ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे यांच्या हस्ते वडवळकर यांना सपत्नीक शाल, श्रीफल, मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, खजिनदार विवेक पाटील, सल्लागार सचिन असराणी, गणेश जाधव, दादा नाईक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!