• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विरोधी पक्ष नेते करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी!

ByEditor

Aug 20, 2023

जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची घेतली सदिच्छा भेट

हरेश मोरे
साई /माणगांव :
मुंबई-गोवा महामार्गाची १६ वर्षापासून वाताहत सुरु असून या महामार्गाचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र, या कामाला म्हणावी तितकी गती नाही. अनेक ठिकाणी या मार्गाचे काम थांबले आहे. मोऱ्या, ब्रिज, उड्डाण पूल, भुयारी मार्ग, बायपास यासारखे अनेक कामे बाकी आहेत. त्यातच या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून कोकण व तळ कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशी नागरिक व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. गणेश उत्सव जवळ आला असून मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, सुरत येथील गणेशभक्त याच मार्गाने कोकणात जातो. त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आपण दौरा करणार असून सरकारला याचा जाब द्यावा लागेल. अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत घेतलेल्या सदिच्छा भेटीत बोलताना दिली. त्यावेळी श्रीवर्धन विधानसभा माजी आ. शाम सावंत यावेळी उपस्थित होते.

पंकज तांबे यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. वडेट्टीवार यांच्या कार्यालयात ता. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी दक्षिण रायगडमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या समस्या तसेच पक्ष बांधणी, अगामी येवू घातलेल्या निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली त्याबाबत त्यांना श्री. तांबे यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी विरोधी पक्ष नेते ना. वडेट्टीवार यांनी आपण लवकरच मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी करून सरकारला रखडलेल्या महामार्गाबाबत जाब विचार असल्याचे सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!