सलीम शेख
माणगांव : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच माणगांवमध्ये चक्क एका शिक्षकाने आपल्याच माजी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, यातील पीडित युवती या आरोपी माध्यमिक विद्यालय माणगांव मुख्याध्यापक सिद्धार्थ बाबुराव म्हात्रे यांची माजी विद्यार्थिनी असुन दि. १५ ऑगस्ट रोजी ११.३६ वा. ते दुपारी ३.४५ वा.च्या दरम्यान पीडित युवती ही तिच्या घरी असताना आरोपी सिध्दार्थ बाबूराव म्हात्रे (वय वर्षे ५० वर्षे रा. साई नगर माणगाव) यांनी पीडित युवतीच्या व्हाट्सअप नंबरवर त्यांच्या व्हॉटसअप नंबरवरुन विचीत्र मॅसेज करून पीडित युवतीला भेटण्यासाठी बोलावले व पीडित युवती ही तिच्या ओळखीतील मैत्रिणीच्या घरी गेली असता आरोपी म्हात्रे यांनी त्या घरासमोरून फेऱ्या मारल्या. तसेच पीडित युवतीने आरोपीला पाठविलेला तिच्या फोटोस गाजराची इमोजी पाठवुन व तिचा फोटो क्रॉप करून त्यावर कमेंट करून वाईट कृत्य केले. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. आघाव करीत आहेत.