• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन महावितरणचा भोंगळ कारभार!

ByEditor

Aug 21, 2023

विज बिल भरले तरी सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा; वीजचोरीकडे मात्र दुर्लक्ष

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन महावितरणतर्फे मिळणारे उशिरा मीटरचे बिल हे नेहमीचे कारण बनले आहे. परिणामी आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या विज ग्राहकावर आता वेळेत बिल भरून सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीवर्धन तालुक्याला होणारा विज पुरवठा व यातून संपूर्ण तालुक्यात होणारा विजेचा वापर यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे मागील दिवसात अनेक विज चोरीच्या घटना समोर आल्या. ही वीजचोरी रोखण्याकडे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कानाडोळा होत आहे. तात्पुरत्या कारवाईचा दिखावा करून या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.

तालुक्यातील वाकलघर येथील दुय्यम अभियंता कार्यालय अंतर्गत आज सोमवारी बोर्ला, वावेपंचतन, धनगरमलई, देवखोल, नागलोली, नागलोली मधलीवाडी, खुजारे, दांड्गुरी, कार्ले, या गावांतील नागरिकांची बिले थकीत आहेत म्हणून नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता महावितरणचे कर्मचारी मीटर कापण्यासाठी आले होते. मात्र, वेळेत बिल भरल्याचा पुरावा देत अनेक विज ग्राहकांनी महावितरणच्या कारवाईला रोखले. वेळेत बिल भरून सुद्धा होत असलेल्या कारवाई विरोधात ग्राहकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

आठ दिवसांनी बिल हातात
या महिन्यातील विज बिलावर देयक तारीख १० असून ग्राहकांना बिल मिळाले १७ तारखेला. आठ दिवसांनी मुदत संपून गेल्यावर ते हा­तात मिळाल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड दंड भरून ग्राहकांना चुकवावा लागत आहे.

ऑनलाईन सिस्टीमला विज बिल भरल्याची ग्राहकाची नोंद झाली नसल्यामुळे थकीत बिलमध्ये चुकीची नावे आली आहेत.

मनोहर जाधव, अभियंता.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!