• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगांवात टेलिग्राम ॲपद्वारे लाखोंची फसवणूक

ByEditor

Aug 21, 2023

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यात टेलिग्राम ॲपद्वारे लाखोंची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान फिर्यादी डॉ. इस्माईल हुसेन रहाटविलकर यांचे मोबाईलवर आरोपी संध्यादेवी, बना पारेख, नोरा, राधिका यांनी टेलीग्राम अॅपव्दारे खोटे आयडी बनवून फिर्यादी यास संपर्क साधुन त्यांना ऑनलाईन एन. वाय. एस. ई. मार्फतीने युटयुब व्हीडीओ सबस्क्राईब व ट्रेडींग करुन आपणास मोठया प्रमाणावर पैसे मिळवून देवू असे बोलून फिर्यादी यांचेकडुन आरोपी क्र. १ व ४ यांनी संगनमत करून फिर्यादी याचे व मित्राचे अकाउंटमधुन १२,२९,२५०/ रुपये वेळोवेळी वेगवेगळ्या अकाउंटवरती ऑनलाईनव्दारे घेवून त्याची अर्थिक फसवणूक केली असून आजतागायत एन. आय. एस. ई. कंपनीचे मार्फत काहीएक रक्कम परत मिळाली नाही. या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!