• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विमला तलाव येथील ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त; उनापा प्रशासनाचे दुर्लक्ष

ByEditor

Aug 21, 2023

घनःश्याम कडू
उरण :
उरण नगरपालिकेच्या माध्यमातून विमला तलाव येथे ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. त्यातील काही साहित्य नादुरुस्त झाले आहे. याची कल्पना उरण नगरपालिका प्रशासनाला देऊन काही दिवसांचा अवधी उलटूनही ते दुरुस्त केले जात नसल्याने मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

नगरपालिकेच्या माध्यमातून विमला तलावात मॉर्निंग वॉकसाठी ओपन जिमची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यायाम करणे सोयीचे होत आहे. या साहित्यांची सर्व्हिसिंग न झाल्याने काही साहित्य नादुरुस्त झाले आहेत. याची कल्पना नगरपालिका प्रशासनाला जागृत नागरिकांनी त्वरित कल्पना दिली. ओपन जिमची दुरुस्ती करण्याची मागणी करून काही दिवसांचा अवधी उलटूनही त्याकडे लक्ष देण्यास नगरपालिका प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसत आहे. यामुळे इतर साहित्यही नादुरुस्त होण्याच्या मार्गावर असल्याने मॉर्निंग वॉक नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित ओपन जिमचे नादुरुस्त साहित्य दुरुस्त करण्याची मागणी मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!