अलिबाग । प्रतिनिधी
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने २०२५ – २०२६ या एका आर्थिक वर्षात ३०६ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. एका आर्थिक वर्षात ३०० कोटी रुपयां पेक्षा जास्त एकत्रित व्यवसाय करणारी आदर्श पतसंस्था ही रायगड जिल्ह्यातील पहिली पतसंस्था ठरली आहे. आदर्शने एकूण १०५९ कोटी रूपयांचा एकत्रीत व्यवसाय केला असून आदर्श पतसंस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे. निव्वळ नफा ०९ कोटी २५ लाख रूपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निव्वळ नफ्यात ०१ कोटी ७४ लाख रूपये वाढ झाली आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
आदर्श च्या ठेवी रु. ५९६ कोटी ८८ लाखाच्या असून रु. ४६२ कोटी ३२ लाख रूपयांचे कर्ज आहे. २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने ७५२ कोटी ७७ लाख रूपयांचा एकत्रित व्यवसाय केला होता. मार्च २०२६ पर्यंत १००० कोटी रूपयांचा एकत्रीत व्यवसाय करण्याचे आम्ही नियोजन केले होते. परंतु ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आज आदर्शचा एकत्रीत व्यवसाय रु. १०५९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे , आदर्शचा मोठ्या प्रमाणावर एकत्रित व्यवसाय असूनही ग्रॉस एन पी ए १ टक्क्या पेक्षा कमी आहे.
सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षापेक्षा २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षात ३०६ कोटी ४३ लाख रूपयांनी एकत्रित व्यवसाय वाढला आहे. मागील वर्षी ७५२ कोटी ७७ लाख रूपयांचा एकत्रीत व्यवसाय होता. आदर्शचे वसूल भागभांडवल २१ कोटी ८५ लाख रूपये आहे. आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवी ५९६ कोटी ८८ लाख रुपयांच्या आहेत . गेल्या वर्षी ४३४ कोटी ६६ लाख रूपये ठेवी होत्या. त्यात १६२ कोटी २२ लाख रूपयांनी वाढ झाली आहे. २०२४ – २०२५ या वर्षामध्ये २६८ कोटी रूपये कर्ज होते. २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षात ४६२ कोटी ३२ लाख रूपये कर्ज आहे. अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली.
आदर्शचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकूण २२ शाखा आहेत व संस्थेने नागडोंगरी चेंढरे येथे एक स्वतंत्र गोल्ड विभाग सुरू केला आहे , संस्थेच्या दोन शाखा पुण्यात आहेत. या वर्षात संस्थेने पुण्यातील नफ्यात असणार्या सरस्वती पतसंस्थेचे विलीनीकरण केले. सर्व शाखांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही १०५९ कोटी रूपयांच्या व्यवसायाचा पल्ला गाठू शकलो, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
उत्तम ग्राहक सेवेमुळे रायगड मधील एकत्रित व्यवसायमध्ये अव्वल असणार्या आपल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा विश्वास मोठ्या वाढतच आहे. त्यामुळे आदर्शच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे . कर्ज वसूली करतानाही कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही, त्यामुळे नेट ० टक्के एनपीए प्रमाणसह हा एकत्रित व्यवसायाचा पल्ला गाठता आला, असे आदर्शचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले .
