• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रिक्षामधून तोल जाऊन २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

ByEditor

Aug 21, 2023

सलीम शेख
माणगाव :
म्हसळा ते माणगांव रोडवर मौजे बोर्ले गावच्या हद्दीत रिक्षामधून तोल जाऊन खाली पडल्याने २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ३.४५ वा. च्या सुमारास मौजे बोर्ले गावच्या हद्दीत आरोपी रिक्षाचालक सुभाष आप्पा शेलार याने त्याचे ताब्यातील ऑटो रिक्षा क्र एमएच ०६ बीव्ही ३८६९ मौजे नाइटने येथून जात असताना स्वतःच्या रिक्षात प्रमाणपेक्षा जास्त एकुण ५ प्रवाशी बसवून निलेश गणेश डवले, वय २८ वर्षे, रा. नाईटने याला चालक याने त्याचे डावे साइटला बसवून रिक्षा अतिवेगात, घाईने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवित घेवुन जात असताना मौजे बोर्ले गावचे हद्दीत आले असता निलेश डवले याचा रिक्षामधून तोल जावून तो खाली रोडवर पडुन त्याचे डोक्यास गंभीर दुखापत होवुन तो बेशुध्द पडला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. भोजकर करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!