• Sat. May 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव एस. एस. निकम इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षा निकाल १०० टक्के

ByEditor

May 2, 2026

कु. मंथन फराडे ८५.८३% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम, उज्वल यशाची परंपरा कायम

माणगाव । सलीम शेख
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवार दि.२ मे २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव येथील माणगाव एजुकेशन ट्रस्ट माणगाव संचालित एस.एस.निकम इंग्लिश ज्युनिअर कॉलेज माणगावने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या ज्युनिअर सायन्स कॉलेजचा बारावी परीक्षेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून कु.मंथन अरुण फराडे या विद्यार्थ्याने ८५.८३ टक्के इतके गुण संपादन करून कॉलेजमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

या कॉलेजमधून कु. इमाद फरिद अहमद सनगे या विद्यार्थिनींने ७७ टक्के इतके गुण संपादन करून द्वितीय क्रमांक,कु. इफ़्रा निजार खान या विद्यार्थिनीने ७४.६७ टक्के इतके गुण संपादन करून तृतीय क्रमांक, कु. श्रावणी प्रफुल्ला गवळी या विद्यार्थिनीने ७४.३३ टक्के इतके गुण संपादन करून चतुर्थ क्रमांक तर कु. अरिबा अब्दुल बासित सनगे या विद्यार्थिनीने ७३.३३ टक्के इतके गुण संपादन करून अनुक्रमे पाचवा क्रमांक पटकावत यश संपादन केले. या कॉलेजमधून यावर्षी बारावी परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी विशेष श्रेणीत २ विद्यार्थी,प्रथम श्रेणीत १८ तर २० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या कॉलेजचा दरवर्षी निकाल उंचावत असल्याने पालकवर्गांमधे तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि पालकांचे सहकार्य या त्रिसूत्रीमुळेच हे यश साध्य झाले आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संगीता कोकाटे यांनी केले. या यशाबद्दल संपूर्ण माणगाव परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच एस. एस. निकम इंग्लिश स्कुल व जुनिअर कॉलेज माणगावच्या प्राचार्या डॉ. संगीता कोकाटे सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!