उरण | घन:श्याम कडू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात उरण येथील यू. ई. एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महाविद्यालयाच्या सायन्स विभागाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, कॉमर्स विभागाने ९९.५३ टक्के अशा घवघवीत यशाची नोंद केली आहे.
सायन्स विभाग: मुलींचे वर्चस्व
सायन्स विभागात एकूण २२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व २२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवत्तेमध्ये मुलींनी बाजी मारली असून अग्रक्रमाचे तिन्ही क्रमांक पटकावले आहेत.
प्रथम: रिया नरेंद्र काकडे (८२.८३%)
द्वितीय: आस्था प्रताप मोकाशी (८१.५०%)
तृतीय: मुग्धा अमोल कोशे (७९.८३%)
चौथा: रोनक राजेश कांबळे (७९.६७%)
पाचवा: श्रेयश सतीश नाईक (७९.५०%)
या विभागात ११ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (डिस्टिंक्शन), तर ९३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
कॉमर्स विभाग: रोहिन खेडकर प्रथम
कॉमर्स विभागात २१७ पैकी २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल गुणात्मकदृष्ट्या अत्यंत उच्च राहिला असून ६१ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मिळवली आहे.
प्रथम: रोहिन धीरज दीपक खेडकर (९३.६७%)
द्वितीय: मीतकुमार अमृतलाल सोनी (९१.५०%)
तृतीय: पलक विलास काठे (९१.००%)
चौथा: विहंग घनश्याम कडू व विनय राजेंद्र पाटील (९०.६७%)
पाचवा: साईतेज गणेश धोत्रे (८९.१७%)
महाविद्यालयाचा यंदाचा निकाल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून गुणात्मक पातळीवरही उल्लेखनीय ठरला आहे. सायन्समध्ये ९३ तर कॉमर्समध्ये ९७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेची व्यवस्थापन समिती, प्राचार्य, शिक्षक आणि पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. मेहनती विद्यार्थी आणि त्यांना मिळालेले योग्य शैक्षणिक मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे उरण परिसरातून आणि विविध सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे.
