नागोठणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत बीईएस एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने आपले यशाचे सातत्य कायम राखले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी सुवर्णयशाची परंपरा जोपासली आहे.
या परीक्षेत आर्यन चितळे याने ८२.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तसेच ज्योझी पानसरे ८२.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर इझहान सय्यद ८०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
शाळेने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदानी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
