• Sun. May 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये किरकोळ वादातून चाकूने वार करत एकाची हत्या, आरोपी गजाआड

ByEditor

May 17, 2026

उरण । घनश्याम कडू
तालुक्यातील जांभूळपाडा येथील आदिवासी वाडीवर दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, उरण पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मात्र भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जांभूळपाडा येथील वाडीवर दोन व्यक्तींमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आरोपीने धारदार चाकूने दुसऱ्या व्यक्तीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याच्या पथकाने कसलाही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!