• Mon. May 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पोलसानी यांची नियुक्ती!

ByEditor

May 18, 2026

मुंबई । ​विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तरुण आणि सक्रिय कार्यकर्ते कु. शिवराज गोवर्धन पोलसानी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांची ‘रायगड जिल्हा उपाध्यक्ष’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ​१८ मे २०२६ रोजी मुंबईतील दादर येथील ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हा नियुक्ती सोहळा संपन्न झाला.

पक्षनेतृत्वाने दाखवला विश्वास

​मनसेचे नेते तथा रायगड जिल्हा संपर्क नेते संदीप देशपांडे, सरचिटणीस व रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष योगेश परुळेकर, आणि उपाध्यक्ष व रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश येरूणकर यांच्या विशेष शिफारशीनुसार शिवराज पोलसानी यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आम्ही पाईक मराठीचे, महाराष्ट्र धर्माचे आणि राजसाहेबांचे’ अशी भावना व्यक्त करत पोलसानी कुटुंबाने या नियुक्तीबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत.

​त्याग, संघर्ष आणि निष्ठेचे फळ

​शिवराज पोलसानी यांना मिळालेले हे पद पोलसानी कुटुंबियांच्या आजवरच्या राजकीय संयम, संघर्ष आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेचे मधुर फळ मानले जात आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी काळात रायगड जिल्ह्यात मनसेची घोडदौड अधिक गतिमान करण्यासाठी आणि पक्ष संघटना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पोलसानी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल त्यांचे वडील गोवर्धन पोलसानी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून शिवराज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!