• Mon. May 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात कुंडलिका नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ByEditor

May 18, 2026

धाटाव | शशिकांत मोरे
रोहा शहराला लागून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या पात्रात आज दुपारी एक अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे रोहा शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अंदाजे ४५ ते ४६ वर्षे वयाच्या पुरुषाचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ ते १ च्या दरम्यान कुंडलिका नदीत भरतीचे पाणी आले असताना, पुलावरून जाणाऱ्या काही नागरिकांना नदीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. नदीपात्रात मृतदेह आढळल्याची बातमी रोहा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली.

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात तरंगणारा मृतदेह बाहेर काढला. या इसमाचा मृत्यू नेमका कसा झाला आणि तो नदीपात्रात कसा आला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, कोणाला या इसमाबाबत काही माहिती असल्यास त्यांनी ओळख पटवण्यासाठी रोहा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील शिरसाट, मेजर शरद कोटकर, याकुब तडवी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!