• Fri. May 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चंद्रकांत कामथे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ

ByEditor

May 29, 2026

धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील नागोठणे येथील आंगरआळी परिसरातील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण कामथे (वय ७८) यांचे बुधवार,दिनांक २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अकस्मात निधन झाले.अलिबाग जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य बचाव अधिवक्ता ॲड. शेखर कामथे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नागोठणे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दिवंगत चंद्रकांत कामथे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे .धाटाव औद्योगिक वसाहतीतील सुदर्शन केमिकल्स कंपनीतून ते सेवानिवृत्त झाले होते. कंपनीच्या युनियन कमिटीमध्ये त्यांनी आपल्या विभागातून कामगारांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या मनमिळावू व मिश्किल स्वभावामुळे मित्रपरिवारात त्यांना विशेष मान होता. ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकींमध्ये विनोदी चुटक्यांमधून ते नेहमीच वातावरणात रंगत आणत असत. त्यांच्या अकस्मात निधनाने मित्रपरिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत चंद्रकांत कामथे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंबा घाटावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागोठणे शहर व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, वकील वर्ग, कामथे परिवारातील नातेवाईक, आप्तेष्ट तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत चंद्रकांत कामथे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी उद्धर (ता. सुधागड) येथे होणार असून उत्तरकार्य रविवार, दिनांक ७ जून रोजी आंगरआळी – नागोठणे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कामथे कुटुंबीयांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!