• Thu. Jun 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बेकायदा ट्रेलर पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण! कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची उरणमधील जनतेची मागणी

ByEditor

Jun 11, 2026

उरण । विठ्ठल ममताबादे
गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर तसेच उरण-पनवेल मुख्य रस्त्यावरील जासई बस स्थानक आणि करळ फाटा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे. या बेकायदा पार्किंगमुळे वाहनचालकांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असून, एखादा मोठा अपघात होऊन नागरिकाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी तीव्र मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.

रस्ते रुंद झाले, पण ट्रेलरच्या विळख्याने कोंडी कायम

काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावरील वाहतूक कोंडी सुटावी आणि नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण केले होते. मात्र, प्रशासनाच्या या प्रयत्नांवर काही स्थानिक गोदाम मालकांनी पाणी फेरले आहे. या गोदाम मालकांकडून रस्त्यावरच चक्क अनधिकृतपणे मोठमोठे ट्रेलर उभे केले जात आहेत. यामुळे करोडो रुपये खर्चून बांधलेला रस्ता पुन्हा अरुंद झाला असून इतर वाहनांना जाण्या-येण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे.

उरणमधील नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, ही दैनंदिन समस्या आता अत्यंत उग्र रूप धारण करू लागली आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम खाते आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

“रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि वाढते अपघात यांसंदर्भात आम्ही जेएनपीए (JNPA) च्या चेअरमनसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. येथील यार्ड्समध्ये केवळ ५० कंटेनरची क्षमता असताना प्रत्यक्षात २५० हून अधिक कंटेनर येतात. जागा अपुरी असल्याने अनेक कंटेनर चालक रस्त्यावर आडवी वाहने उभी करतात. या बेकायदा पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक कोंडी फुटून अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.”
— अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक विभाग.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!