• Tue. Jun 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

२७ जूनच्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाड एसटी प्रशासन सज्ज!

ByEditor

Jun 23, 2026

महाड | मिलिंद माने

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाल्यानंतर, आता २७ जून रोजी तिथीप्रमाणे होणाऱ्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाड एसटी प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी परिवहन मंडळाने चोख नियोजन केले असून, २६ जून रोजी २५ आणि २७ जून रोजी २५ विशेष बसेसच्या फेऱ्या पाचाड ते कोंझर दरम्यान चालवण्यात येणार असल्याची माहिती महाड एसटी आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिली.

यापूर्वी ६ जूनच्या सोहळ्यासाठी महाड आगाराने ४ जून रोजी ५ बसेस, तर ६ आणि ७ जून रोजी प्रतिदिनी तब्बल ८० बसेसच्या फेऱ्या चालवून शिवभक्तांना सुरक्षित प्रवासाची सुविधा दिली होती. ऐतिहासिक ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त आणि पर्यटक रायगडावर दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने ही तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी केवळ एसटी महामंडळच नव्हे, तर गृह खाते, महसूल, जिल्हा परिषद, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि परिवहन विभाग या सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधत रायगडावर जय्यत तयारी सुरू केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!