• Sat. Aug 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवडकर्त्यांची नियुक्ती; ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ByEditor

Jun 23, 2026

​रायगड | क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) वतीने आगामी क्रिकेट हंगामासाठी (२०२६-२७) जिल्ह्यातील अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि संघ निवडकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

​आरडीसीएच्या वतीने दरवर्षी विविध वयोगटातील मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच जिल्ह्यातील तळागाळातील होतकरू व गुणवान क्रिकेट खेळाडूंचा शोध घेण्यासाठी ‘टॅलेंट हंट’ सारखे उपक्रम राबवले जातात. या स्पर्धा आणि उपक्रमांमधून निवडलेल्या खेळाडूंना असोसिएशनतर्फे विशेष सराव सामने आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.

​आगामी हंगामात या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देणे आणि विविध वयोगटातील जिल्हा संघ निवडण्यासाठी पात्र व अनुभवी व्यक्तींची नेमणूक केली जाणार आहे.

​अर्ज कसा करावा?

  • पात्रता: क्रिकेट क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि खेळाडू घडवण्यातील योगदान आवश्यक.
  • अर्जाची पद्धत: इच्छुकांनी आपला संपूर्ण परिचय (बायोडाटा), अनुभव आणि योगदानाचा तपशील आरडीसीएच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवावा.
  • ईमेल आयडी: rdcaanirudhapatil@gmail.com
  • अंतिम तारीख: ३० जून २०२६

अधिक माहितीसाठी संपर्क:

अर्जा संदर्भात किंवा इतर माहितीसाठी आरडीसीएचे सदस्य अरुण शिंदे (९५२७६०८०८०) किंवा देवेंद्र पाटील (९२२६९५११७६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

By Editor

One thought on “रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवडकर्त्यांची नियुक्ती; ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!