• Thu. Jul 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग-रोहा मार्गावर भीषण अपघात; १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, चालक गंभीर जखमी

ByEditor

Jul 2, 2026

अलिबाग (प्रतिनिधी)
अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावच्या हद्दीत गुरुवारी एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरचा ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर गणेश पवार (वय २२, रा. पाटणसई आदिवासीवाडी, तालुका रोहा) हा तरुण त्याची मैत्रीण वृशाली अंकुश वाघमारे (वय १८, रा. तासगाव आदिवासीवाडी, तालुका मुरुड) हिच्यासह दुचाकीवरून अलिबाग-रोहा मार्गाने चालला होता. सुडकोली गावाजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याखालील ओढ्यात कोसळली.

​हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ईश्वर पवार याच्या डाव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वृशाली वाघमारे हिच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्य केले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!