• Sat. Jul 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्लीपंचतनमध्ये सोशल मीडिया ठरला देवदूत; डंपिंग ग्राउंडच्या खड्ड्यात अडकलेल्या प्राण्यांना ग्रामस्थांनी दिले जीवदान!

ByEditor

Jul 4, 2026

‘आम्ही बोर्लीकर’ ग्रुपच्या एका आवाहनाने धावले तरुण

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन स्मशानभूमी जागेत असणाऱ्या ‘डंपिंग ग्राउंड’ च्या खड्ड्यात अडकून पडलेल्या प्राण्यांची सुटका शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. सोशल मीडियामुळे या बचाव कार्यात ग्रामस्थांनी तत्काळ मदत केली आहे.

बोर्लीपंचतन शहरातील स्मशानभूमी जागेत कचरा डेपो म्हणजे मोठी समस्या बनली आहे. कारण अंत्यसंस्कार मिळण्याच्या स्मशानभूमी परिसरात कचरा असल्याने अक्षरशः कचरा डेपोचे हिडीस स्वरूप बनले आहे. सद्या मुसळधार पावसामुळे कचरा साठवणुकीच्या खड्ड्यात पाणी साचले आहे. या परिसराला बंदिस्त भिंत देखील नाही. त्यामुळे मोकाट प्राण्यांचा खाद्यासाठी नेहमी वावर सुरू असताना तीन जनावरे व कुत्र्यांनी खड्ड्यात उडी घेतली. मात्र, पाण्यांनी भरलेल्या कचऱ्याच्या दलदलीत अडकून बसले.

या गंभीर प्रकाराकडे देवा पाटील तरुणाचे लक्ष गेले असता, त्याने तातडीने ‘आम्ही बोर्लीकर’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आव्हान केले. तत्काळ बचावासाठी वैभव कदम, अक्षय दिवेकर, संकेत पाटील, प्रदीप पांगारे, अंकेश कविलकर, श्रवण गायकर, प्रज्योत पांगारे व प्रथमेश धुमाळ यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी धाव घेतली व वेळीच तत्परता दाखवत मुक्या प्राण्यांची सुटका केली.

अशा आपत्कालीन परिस्थितीत प्राणी किंवा मानव सगळेच आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत असतात. त्यामुळे अशी देखील माणसं असतात; जे वेळप्रसंगी मागचा पुढचा विचार न करता संकटात सापडलेल्यांना मदत करायला धावतात. तर शुक्रवारी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मुक्या प्राण्यांना जीवदान मिळाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!