• Wed. Jul 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भरधाव डंपरची स्कूटीला धडक; दोघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा

ByEditor

Jul 15, 2026

अनिकेत मोहित
श्रीवर्धन :
श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील कुरवडे गावाच्या हद्दीत भरधाव डंपरने स्कूटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात स्कूटीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून स्कूटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रद्धा सुहास सुतार (वय ३४, रा. खारगाव बुद्रुक, ता. म्हसळा, जि. रायगड) या आपल्या सहकाऱ्यासह मंगळवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ॲक्टिव्हा स्कूटी (क्र. MH-06-CG-5759) वरून गालसुरे येथून हरिहरेश्वरकडे जात होत्या. कुरवडे गावाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या डंपरचा (क्र. MH-06-CP-9783) चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. यावेळी डंपरने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. श्रद्धा सुतार यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१, १२५ व १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार धम्मपाल कयापाक करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!