• Tue. Jul 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती

ByEditor

Jul 21, 2026

पक्षनिष्ठेची दखल; राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

रोहा । प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर, पक्षनिष्ठेची दखल घेत मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पेणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

अमोल पेणकर हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांनी इतर पक्षात स्थलांतर केले असताना, पेणकर यांनाही विविध राजकीय पक्षांकडून प्रलोभने देण्यात आली होती. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवली. या पक्षनिष्ठेची दखल घेऊनच पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे.

कार्यकर्ते ते पदाधिकारी असा प्रवास

पेणकर यांनी आतापर्यंत रोहा शहराध्यक्ष, रोहा तालुकाध्यक्ष आणि रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. आंदोलने, जनहिताचे प्रश्न आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. या कालावधीत पक्षाची भूमिका मांडताना त्यांच्यावर काही प्रसंगी गुन्हेही दाखल झाले होते, मात्र न डगमगता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.

सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

या नियुक्तीनंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे, तसेच संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर आणि जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. अमोल पेणकर यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण रायगडमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!