• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

LPG गॅस सलग दुसऱ्यांदा स्वस्त, आजपासून व्यावसायिक सिलिंडर 150 रुपयांनी स्वस्त, पाहा नवीन दर

ByEditor

Sep 1, 2023

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरवरील दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसघरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात केल्यानंतर आज १ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला आहे. अशा प्रकारे सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत दोन महिन्यांत २५१ रुपयांनी कमी झाली आहे, जी जुलैमध्ये १७३३ रुपये होती.

व्यावसायिक सिलिंडर आणखी स्वस्त

१९ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. वृत्तानुसार, आजपासून १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर १५७ रुपयांनी कमी दराने उपलब्ध होणार आहेत. नवीन दरानंतर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १४८२ रुपये झाली आहे, जी पूर्वी १६४०.५० रुपये होती. अशा परिस्थितीत आता रेस्टॉरंट मालकांना तसेच मिठाई बनवणाऱ्यांना सणासुदीच्या काळात दर कपातीचा सर्वाधिक फायदा होईल. गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे वस्तूंच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्यातील कपात आणि आजच्या कमी झालेल्या किमतींनंतर व्यावसायिक सिलिंडरवर एकूण २५० रुपयांपेक्षा जास्त कपात झाली असून आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत जुलैमध्ये ११०२ रुपये होती, जी आता ९०२.५० रुपये झाली आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरात कपात
विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना किंमतीतील कपातीचा जास्तीत जास्त फायदा मिळेल. सरकारकडून १० कोटी लाभार्थ्यांना २०० रुपये अनुदान आधीच दिले जात असताना उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारा फायदा ४०० रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. म्हणजेच नवीन बदलानंतर त्यांना सिलिंडरसाठी ९०३ रुपये मोजावे लागतील आणि २०० रुपयांची सबसिडी मिळेल, त्यामुळे त्यांना प्रति सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागतील.

मेट्रो शहरात व्यावसायिक LPG गॅसचे नवीन दर
दिल्ली —- १५२२.५० रुपये
कोलकाता— १६३६ रुपये
मुंबई— १४८२ रुपये
चेन्नई— १६९५ रुपये

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!