• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

४ सप्टेंबरला माणगाव तालुका बंद!

ByEditor

Sep 2, 2023

जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ दिली बंदची हाक

सलीम शेख
माणगाव :
जालना येथील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ता. ४ सप्टेंबर रोजी सोमवारी माणगाव तालुका बंद करण्याची हाक माणगाव तालुका सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. आघाव यांना दिलेल्या निवेदनातून माहिती दिली.

माणगाव तालुका सकल मराठा समाजाची बैठक माणगाव येथील क्षत्रिय मराठा भवन येथे ता. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वा. पार पडली. त्यावेळी जालना जिल्ह्यात मराठा समाजबांधवांवर झालेल्या अमानुष हल्याच्या निषेधार्थ माणगाव तालुका ४ सप्टेंबर रोजी बंद करण्याचे हाक दिली. यावेळी सकल मराठा समाजातील तमाम नागरिक सकाळी बालाजी कॉम्प्लेक्स माणगाव येथे जमून ते बाजारपेठेतून प्रांत कार्यालयावर जावून माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांना निवेदन देणार आहेत. हे आंदोलन शांततेत केले जाणार असून सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान माणगाव तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने एका लेखी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. माणगाव तालुका शांततेत बंद करण्यासाठी माणगाव तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दळवी यांनाही निवेदनाद्वारे कळविले आहे.

यावेळी क्षत्रिय मराठा समाज माणगाव तालुकाध्यक्ष राजू मोरे, प्रशांत अधिकारी, आनंद थोरात, सुजित शिंदे, संतोष शेलार, सुरज कडू, संजोग मानकर, विश्वास खानविलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!