• Tue. Jul 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कळमजे येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

ByEditor

Sep 6, 2023

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील कळमजे येथील तरुण शेतात काम करत असताना त्याला सर्पाने दंश केल्याने उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यास आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदरील घटना मंगळवार, दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी घडली. या घटनेची खबर मिलिंद वसंत वाढवळ (वय-३८) रा. कळमजे ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत मागणाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत तरुण ऋतिक संजय वाढवळ (वय-२२) रा. कळमजे ता. माणगाव हा त्याच्या शेतामध्ये काम करीत असताना कोणत्यातरी विषारी सापाने त्यास दंश केल्याने उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यास आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. ४४/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौजदार श्री. निमकर हे करीत आहेत. दरम्यान, घटनेतील कळमजे गावातील तरुण ऋतिक संजय वाढवळ हा माणगावात पाण्याचे जार टाकत असल्याने तो अनेकांच्या परिचयाचा होता. त्याचे सर्पदंशाने निधन झाल्याची माहिती समजताच भाजपच्या पंचायतराज व ग्रामविकास कोकण विभाग संयोजिका शर्मिला सत्वे यांनी तसेच कळमजे गावातील ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन ऋतिक वाढवळ याच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. कै. ऋतिक वाढवळ याच्यावर कळमजे येथील स्मशानभूमीत त्याच दिवशी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!