किरण लाड
नागोठणे : भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसुचनेनुसार जुन महिन्यात अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असुन त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची दाट शक्यता असल्याने नागरीकांना, तसेच संबंधित विभागांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व सामान्य व्यवस्थापन रायगड जिल्हा यांच्या वतीने सर्व संबंधित विभागांना, नागरिकांना, मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या 4 जुन, 2023 च्या पूर्वसुचनांनुसार 8 जुन ते 12 जुनच्या दरम्यान मुंबई, पुणे, कोकण तसेच महाराष्ट्रातील काही भागात या संभावित चक्रीवादळाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता निर्माण होणार आहे. जोरदार वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरील शक्यते बरोबर कोकणात काही भागात मुसळधार पाऊस पडुन महापुर येऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या धोक्याची पुर्वसुचना प्रादेशिक हवामान खात्याने चक्रीवादळाचा फटका बसणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील संभाव्य जिल्ह्यांना दिली आहे.