• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

साळाव पुल गुरुवारपासून तीन दिवस पुर्णपणे बंद

ByEditor

Jun 6, 2023

संतोष रांजणकर
मुरूड :
मुरूड-अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पुलावरून पाच टनांवरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातलेली आहे. महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गुरुवार, ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे.

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा-साळाव पुलावरून होणाऱ्या अति अवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा-साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी पुलावरून ५ टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. यात ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान पुलाच्या लोड टेस्टिंगचे काम केले जाणार आहे. त्यासाठी हा पूल तीन दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड- वडखळ- नागोठणे-कोलाड-साळाव मार्गे होणार आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रोहा-तळेखार-साळावमार्गे आहे. मुरूड-अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरूड-साळाव-तळेखार-चणेरा-रोहा-कोलाड-नागोठणे-वडखळ-पोयनाड-अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापरही करू शकतात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!