नागोठणे । महेंद्र म्हात्रे
पेण तालुक्यातील वढाव येथील रहिवासी व पत्रकार प्रकाश माळी यांच्या मातोश्री लिलाबाई बाबु माळी यांचे वयाच्या ७५व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वढाव परिसर व माळी परिवारावर शोककळा पसरली आहे.
कै. लिलाबाई माळी या अत्यंत कष्टाळू, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबाला धीर देत त्यांनी आपल्या मुलांना कष्टाचे, प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे संस्कार दिले. पत्रकार प्रकाश माळी यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीत आणि जडणघडणीत त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचा मोठा वाटा राहिला.
लिलाबाई यांच्या निधनाने माळी परिवाराने एक भक्कम आधारवड गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी माळी परिवाराचे सांत्वन करत दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
