फळे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न असे सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात. फळांचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत. असे मानले जाते की अधिक फायदे मिळविण्यासाठी आपल्याला योग्य वेळ, फळे खाण्याची योग्य मात्रा आणि फळांसोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये हे माहित असायला हवे. बरेच लोक जेवणासोबत, रात्री, दुपारी किंवा कोणत्याही गोष्टीसोबत फळे खातात.
फळे खाण्याची ही पद्धत पूर्णपणे चुकीची असल्याचे जाणकार सांगतात. तसेच फळे खाल्ल्यानंतर बरेच लोक भरपूर पाणी पितात. ही चूक तुमच्या आरोग्याला भारी पडू शकते. डॉ. विनोद शर्मा यांच्या मते, काही फळे अशी आहेत जी खाल्ल्यानंतर तुम्ही चुकूनही पाणी पिऊ नये. असे केल्याने पोट आणि पचनाच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणती फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.
डाळिंब

डाळिंब हे असे फळ आहे, जे सर्वांनाच आवडते. हे गोड आणि लाल रसरशीत फळ शरीराची वाढ आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. पण ते खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. असे केल्याने तुम्हाला मळमळ, आम्लपित्त आणि उलट्या होऊ शकतात.
केळी

केळी हा ऊर्जेचा एक मजबूत स्रोत आहे आणि त्यात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. केळीमुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळत असला, तरी त्यावर पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते.
आंबट फळे

संत्री, आवळा, द्राक्षे, मोसंबी यांसारखी आंबट फळे खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची चूक करू नका. असे केल्याने तुमच्या शरीराची पीएच पातळी बिघडू शकते आणि पचनसंस्था देखील बिघडते.
कलिंगड

लाल रंगाचे कलिंगड हे एक पाणीयुक्त फळ आहे. कलिंगडावर पाणी पिऊ नये असे डॉक्टरांचे मत आहे. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्हाला लूज मोशन होऊ शकतात.
पेरू

पेरू हा फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी याशिवाय फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, तांबे यांचा चांगला स्रोत आहे. पेत्रू खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. पण तयावर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया ठप्प होऊ शकते.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.