• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लाचलुचपत विभागाची सिडकोत कारवाई: युनियन अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना रंगेहाथ अटक

ByEditor

Jun 21, 2025

नवी मुंबई : सिडकोमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री रंगेहाथ अटक केली. विशेष बाब म्हणजे हिरे यांनी सिडकोत निलंबित झालेल्या कार्यकारी अभियंता कल्याण पाटील यांच्याकडून चौकशीत मदतीसाठी ₹1.5 लाख लाचेची मागणी केली होती.

कल्याण पाटील यांच्यावर याआधी लाच घेतल्याचा आरोप असून त्यानंतर त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू आहे. हिरे यांच्याकडून झालेल्या पैशांच्या मागणीबाबत पाटील यांनी ACBकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे ACBने सिडको मुख्यालयात सापळा रचत हिरे यांना पकडले.

पोलिस तपासात असेही समोर आले आहे की हिरे यांनी आणखी दोन कर्मचाऱ्यांची नावे घेऊन एकूण ₹4.5 लाखांची मागणी केली होती. हिरे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ACB कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणामुळे सिडकोमधील कर्मचारी संघटनांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी संचालक नामदेव भगत यांनी सिडकोमधील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत स्पष्टपणे सांगितले की, “पैसे दिल्याशिवाय सिडकोत कामं होत नाहीत.”

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!