• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

ByEditor

Jun 21, 2025

विद्यार्थ्यांनी विविध योग प्रकारांमध्ये घेतली उत्स्फूर्त सहभागिता

नागोठणे, २१ जून : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच अंतर्गत मुल्यमापन विभागाचे प्रमुख डॉ. संदेश गुरव होते. कार्यक्रमात डॉ. मनोहर सिरसाठ आणि डॉ. विलास जाधवर यांनी विद्यार्थ्यांना योगासने व त्याचे शारीरिक व मानसिक फायदे याबद्दल मार्गदर्शन केले.

या योग सत्रात अनुलोम–विलोम, नाडी शोधन, भस्त्रिका, तीन टप्प्याचे प्राणायाम आणि लाफ्टर योग अशा विविध योग प्रकारांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला. सर्व उपस्थितांनी या सत्रात उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला प्रा. डॉ. सतिष पाटील, प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. विकास शिंदे, प्रा. डॉ. राणी ठाकरे, प्रा. चैत्राली पाटील, प्रा. प्राची दांडेकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!